आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

मुकुटबन ,झरी व शिबला रुग्णालयातील 80 टक्के पदे रिक्त

0

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.

तालुक्यात नुकूटबन व शिबला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर झरी येथे ग्रामीण रुग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय आहे. चारही ठिकाणी कर्मचारी यांचे 80 टक्के पद रिक्त असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात जिल्ह्यासह तालुक्यात पसरला आहे. त्यामुळे रुग्णाच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचार करणे, त्यांची जेवणाची, राहण्याची व इतर व्यवस्था करणे ही मोठी जवाबदारी आरोग्य विभागावर आहे.

तसेच दररोज लसीकरण ,टेस्टिंग करणे तसेच दररोज रिपोर्टिंग करणे, डेटा भरणे, रुग्णालय तसेच कोविड सेंटर साफसफाई करणे याकरिता रुग्णालयात व तालुका वैद्यकीय कार्यालयात कर्मचारी यांची नितांत गरज आहे. तरीही 80 टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना तालुका सांभाळता नाकी नऊ येत आहे.

रुग्णालयात एॅमबुलन्स आहे तर ड्रायव्हर नाही.याकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, दोन जिल्हा परिषद सदस्य तसेच वरिष्ठ अधिकारी असूनसुद्धा त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आजपर्यंत तालुक्यातील आरोग्य सुविधेबाबत कधी आढावा घेण्यात आला का ? तालुक्यातील गोरगरीब आदिवासी जनतेच्या आरोग्याची चिंता या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्याना कधी जाणवली का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

कोरोनाचा तांडव सुरू झाल्यापासून कर्मचारी अभावी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. झरी येथील सर्वात महत्वाचे म्हणजे तालुका वैद्यकीय कार्यालयात 6 डॉक्टर, 12 स्टाफ नर्स, 2 प्रयोगशाळा वैद्यकीय अधीकारी असे 20 पदे रिक्त आहे. झरी ग्रामीण रुग्णालयात 1 वैद्यकीय अधिकारी, 2 स्टॉप नर्स व चतुर्थश्रेणी कर्मचारी 4 पैकी 3 पद रिक्त आहे.

झरी ग्रामीण रुग्णालयातील 1 वैद्यकीय अधिकारी यांना वणीला डेपुटेशनवर देण्यात आले आहे तर एक स्टाफ नर्सलासुद्धा मारेगाव येथे देण्यात आले आहे.त्यामुळे झरी ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी आणखी कमी झाले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तीन शिफ्टमध्ये होणाऱ्या कामाला एकच कर्मचारी असल्याने आळा बसला आहे.

तालुक्यातील मुकुटबन गाव बाजारठेने सर्वात मोठे गाव आहे. मुकुटबन गावाशी परिसरातील 30 ते 40 गावाचा संपर्क खरेदी, शासकीय व रुग्णालयाच्या कामानिमित्त पडतो. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने गोरगरीब जनता मोठ्या प्रमाणात येतात. परंतु या रुग्णालयातील 16 पैकी 10 पदे रिक्त असल्याने रुग्णासोबत खेळखंडोबा सुरू आहे.

रुग्णालयाची ओपीडी बऱ्यापैकी असून रुग्णांना पाहिजे तशी सेवा देण्यास कर्मचाऱ्यांअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे . रुग्णालयात एकूण 16 पद भरणे आवश्यक असताना केवळ 8 पदे भरले असून 10 पदे रिक्त आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी 1, आरोग्य सेवक 5 आरोग्य सेविका 4, महिला आरोग्य सेवक 1, पुरुष आरोग्य सेवक 1, पुरुष आरोग्य सहाय्यक 1,

प्रयोगशाळा वैद्यकिय अधिकारी 1, औषध निर्माण अधिकारी 1, वाहन चालक 1, सफाई कामगार 1, व परिचर 3 असे एकूण 10 पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील कर्मचारी कमी असल्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोरोनाचा कामाचा व्याप कमी करण्याकरिता 150 रुपये प्रमाणे काही लोकांना ठेवले.

तर टेक्निशियन यांनासुद्धा डेलीविजेसवर ठेऊन काम करून घेत असल्याचे सांगितले. परंतु अजूनही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे डोळे उघडले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तरी तालुक्यातील सर्व आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत अशी मागणी होत आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, झरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ विरखडे तर मुकुटबनचे वैद्यकीय अधिकारी डॉ पंडित हे मोठ्या अडचणीतून रुग्णांचा व त्यांच्या रोषाचा सामना करीत आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे तालुक्यात चांगल्या प्रकारे कार्य करीत असताना त्यांना मारेगाव येथील प्रभार दिल्याने झरी तालुक्यातील रुग्णांकडे लक्ष देणार की मारेगावच्या असा संतप्त प्रश्न तालुक्यातील जनता करीत आहे. गेडाम यांच्याकडून मारेगावचा प्रभार काढून वणी येथिल अधिकारी यांना द्यावे. वणीवरून मारेगाव जवळ असताना झरी येथील डॉक्टरकडे का देण्यात आले. तरी डॉ गेडाम यांच्याकडील प्रभार काढण्यात यावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे

हेदेखील वाचा

आज तालुक्यात 75 पॉजिटिव्ह

 हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.