ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

राजूरमध्ये मंगळवारी घडला थरार, परस्पर तक्रार दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील राजूर येथे दोन चिकन व्यावसायिकांमध्ये ग्राहकांवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही व्यावसायिकांनी एकमेकांवर कोंबडी कापायचा सत्तूर घेऊन चालून आले. यात एक जण जखमी झाला आहे. तर दुस-या व्यावसायिकालाही दुखापत झाली आहे. मंगळवारी दिनांक 4 मे रोजी ही घटना घडली. या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की राजूर येथील वार्ड क्रमांक 4 मध्ये अरशद खान सरवर खान (19) यांचे चिकनचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या समोरच सरवर अली शमीम अली (50) यांचे देखील चिकनचे दुकान आहे. मंगळवारी त्यांच्यामध्ये ग्राहकांवरून वाद झाला. हा वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोघांनीही आपापले कोंबडी कापायचे हत्यार एकमेंकावर उगारले. या हल्ल्यात अरशदच्या कमरेला घाव होऊन जखमी झाला. तर या झटापटीत सरवर अली शमीम अली यांच्याही पाठीवर वार झाल्याने दुखापत झाली आहे.

या प्रकऱणी दोन्ही चिकन व्यावसायिकांनी वणी पोलीस स्टेशन गाठले व एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. अरशद खान सरवर खान यांच्या तक्रारीवरून सरवर अली शमीम अली (50) व साहिल सरवर अली (19) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 326, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर सरवर अली शमीम अली यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अरशद खान सरवर खान (19) व सरवर खान याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम 324, 524, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

गेल्या आठवड्यातच वणीत दोन प्रतिष्ठीत व्यावसायिकांमध्ये ग्राहक खेचण्यावर हाणामारी झाली होती. ही घटना ताजी असतानाच एकमेकांवर सत्तूरने वार करण्याची घटना घडली आहे. लॉकडाऊनमध्ये अशा घटना होत आहे हे विशेष.

हे देखील वाचा:

कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

सावंगीच्या सभामंडपाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.