कोरोनाचा आजही कहर, तालुक्यात 234 पॉझिटिव्ह

सावर्ला येथे 33 रुग्ण, 41 रुग्णांची कोरोनावर मात

0

जब्बार चीनी, वणी: मंगळवारूी रेकॉर्डब्रेक 267 रुग्ण आढळून आल्यानंतर आज बुधवारी देखील कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज तालुक्यात तब्बल 234 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 84 पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात 139 रुग्ण आढळून आले आहे. यात सावर्ला येथे एकाच दिवशी 33 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 11 इतर ठिकाणाचे रुग्ण आहेत. दरम्यान आज 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली. विशेष म्हणजे आज तब्बल 525 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यामुळे आज रुग्णांची संख्या अधिक आली आहे.

आज वणीत आलेल्या 84 रुग्णांमध्ये रविनगर येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत. तर जैन ले आउट व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 5 रुग्ण आढळलेत. तर विठ्ठलवाडी, कनकवाडी, गुरुनगर, प्रगती नगर व नटराज चौक येथे प्रत्येकी 4, रंगारी पुरा, गाडगे बाबा चौक येथे प्रत्येकी 3, सानेगुरुजी नगर, रंगनाथ नगर, जत्रा रोड, गुरुवर्य कॉलनी, साईश्रद्धा नगरी, इंदिरा चौक, झेडपी कॉलनी, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर फाले आऊट भीम नगर एल टी कॉलेज टागोर चौक टिळक नगर, लक्ष्मी नगर, सहकारी बँक, पटवारी कॉलनी, आनंद नगर, द्वारका आपारमेंट, शिवाजी चौक, नांदेपेरा रोड, नारायण निवास, ओल्ड कॉटन मार्केट, मोमीनपुरा, वासेकर ले आऊट, सावरकर चौक, शिवाजी चौक, सिंधी कॉलनी, भोंगळे लेआउट, ओम नगर. कोंडावार ले आऊट, जगत अपार्टमेंट, विद्यानगरी, आयटीआय कॉलनी, लॉयन स्कूल, सर्वोदय चौक, रामपुरा, साईलीला अपार्टमेंट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात 139 रुग्ण आढळले यात सावरला येथे सर्वाधिक रुग्ण 33 रुग्ण आढळले. त्या खालोखाल गणेशपूर येथे 11, शिंदोला व लालगुडा येथे प्रत्येकी 10, चिखलगाव येथे 9, कुरई 6, रासा 5, शिरपूर, नवरगाव व राजुर व कोलगाव येथे प्रत्येकी 3, भालर टाऊनशिप, मंदर, केसुर्ली, पळसोनी, गुलमोहर पार्क, इजासन, पुनवट, भालर, शेलू, साखरा, बोरगाव येथे प्रत्येकी 2 तर मोहदा, येनक, परम डोह, पिंपळगाव, निळापुर, वारगाव, टाकळी, साखरा, सावंगी, हनुमान नगर, वांजरी, वडगाव, वारगाव नांदेपेरा, मेंढोली, कोलार पिंपरी, ब्राह्मणी, भांदेवाडा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. यासह मारेगाव तालुक्यातील 7 रुग्ण झरी तालुक्यातील 3 रुग्ण व करंजी येथील एक व्यक्ती वणी येथे पॉझिटिव आली आहे.

आज यवतमाळ येथून 436 अहवाल प्राप्त झालेत. यात 143 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 525 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 91 पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 120 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे.

सध्या तालुक्यात 1061 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 60 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 959 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 42 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 3972 रुग्ण आढळून आलेत. यातील 2851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

ग्राहकांवरून दोन चिकन व्यावसायिकांमध्ये जुंपली, एकमेकांवर सत्तूरने हल्ला

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

वणीत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे निदर्शने

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.