जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी दिलासादायक ठरला. आज शनिवारी दिनांक 8 मे रोजी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या अधिक आली. आज तालुक्यात कोरोनाचे 95 रुग्ण आढळलेत तर 104 रुग्णांनी कोरोनावर मात केली. गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तीच्या दरात घट झाली तर कोरोनामुक्त होणा-या व्यक्तींच्या दरात वाढ झाली आहे. ही तालुकावासियांसाठी एक दिलासा दायक बाब आहे.
आज शहरात 37 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 95 पॉझिटिव्ह आढळून आलेत. 3 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 945 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान आज यवतमाळ येथे वणी तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात एक 25 वर्षीय तरुण तर एक 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यांच्यावर शासकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू होता. दरम्यान उद्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाविषयक नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. यात निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान सुरू दिसल्यास दुकान मालकाकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जणार आहे. तर भाजी व फळ विक्रेत्यांना दुकान थाटून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आज वणी शहरात आलेल्या 37 रुग्णांमध्ये कनकवाडी येथील 4 पॉझिटिव्ह, नटराज चौक, पहाडपूर, गुरुनगर, भीमनगर, सेवानगर, मनिष नगर, प्रगती नगर येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. यासह मनिप्रभा टॉवर, ओल्ड कॉटन मार्केट, गुरुवर्य कॉलनी, खाती चौक गोरक्षण जवळ, माळीपुरा, जत्रा रोड, विराणी टॉकीज जवळ, सुभाषचंद्र बोस चौक, महात्मा फुले चौक, झेडपी कॉलनी, दत्तनगर, रविनगर, चट्टे ले आउट, आनंद नगर, मोमिनपुरा, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
ग्रामीण भागात आलेल्या 55 रुग्णांपैकी चिखलगाव येथे सर्वाधिक 6 रुग्ण आढळले तर राजुर, बोरगाव येथे प्रत्येकी 4 रुग्ण आढळलेत. ब्राह्मणी, कोना, पिंपरी येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळले. मंदर मुर्धोनी नवरगाव, डोंगरगाव, ढाकोरी, भांदेवाडा, बोधाड येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर भालर कॉलनी, गणेशपूर, रासा, पठारपूर, येनक, कृष्णाणपुर, महांकालपूर, वांजरी, परसोडा (साखरा) निंबाळा, वागदरा. वडजापूर, पुनवट, सोनापूर, शिंदोला चनाखा, उमरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे,
आज यवतमाळ येथून 240 अहवाल प्राप्त झालेत. यात 40 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 396 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 55 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 368 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 844 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात 945 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 74 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 832 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 39 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4197 रुग्ण आढळून आलेत. यातील 3188 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा:
निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड