विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरातील दवाखान्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. अशातच युवा सेनेने ज्या गरीब रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही त्यांच्याकरिता घरीच ऑक्सीजन सिलेंडर लावून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सीजनची कमतरता भासत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सीजनसाठी धावपळ होताना दिसत आहे. ही दुरवस्था पाहून शिवसेनेचे वणी विधानसभा संघटक सुनील कातकडे यांनी ऑक्सीजन सिलेन्डरची व्यवस्था केली. युवासेनेचे उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गरजू रुग्णांच्या घरी जाऊन रूग्णांना ऑक्सीजन लावून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
सोमवारी शहरातील रंगनाथ नगर परीसरातील आशा ठाकूर नामक महिलेला ऑक्सीजनची आवश्यकता होती. परंतु कुठेही ऑक्सीजन मिळत नव्हते. ही बाब युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांना माहिती होताच त्यांनी लगेच त्या महिलेच्या घरी जाऊन तिला ऑक्सीजन लावून दिले.
अजूनही शहरातील कुणालाही ऑक्सीजनची आवश्यकता असल्याची रुग्णाला त्याच्या घरीच ऑक्सीजन लावून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी सुरू केलेल्या या कार्याला आता अनेक सामाजिक संघटनांनी हातभार लावावा अशी वणीकरांकडून मागणी होत आहे. युवासेनेद्वारे सुरू केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
दिलासादायक: तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट
हेदेखील वाचा