जितेंद्र कोठारी, वणी: आधी आरोपीने एका तरुणीला आपल्या प्रेमात जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या बहर फुलताना तो तिला कारने शहराबाहेर निर्जण ठिकाणी घेऊन जायचा. मात्र एक दिवस अचानक प्रेयसीने ती त्याच्यापासून गर्भवती असल्याचे सांगतले. मात्र तो गोडी गुलाबी करणारा प्रियकराने हात झटकत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली. अखेर पीडितेने याबाबत पोलिसात तक्रार दिली. सध्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
सविस्तर वृत्त असे की चिखलगाव येथे सुभाष शंकर गेडाम (27) हा राहतो. पीडित तरुणी देखील गावातच राहते. गावात राहत असल्याने त्यांच्यात ओळख होती. पाच वर्षांआधी त्यांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे वचन दिले. पुढे आरोपी पीडितेला शहराबाहेर कारने फिरायला घेऊन जायचा. त्यांच्या प्रेमाचे रंग अधिक गहिरे होत गेले.
पीडिता आरोपीकडे लग्नाची गळ घालायची. मात्र आरोपी त्याकडे टाळाटाळ करायचा. दरम्यान पीडिता ही गर्भवती राहिली. त्यामुळे पीडितेने आरोपीवर लग्नासाठी दबाव वाढवला. मात्र यावेळी आरोपीने या प्रकरणातून हात झटकले. अखेर पीडितेने याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी सुभाष शंकर गेडाम याच्या विरोधात भादंविच्या कमल 376, 2 (N) नुसार गुन्हा दाखल केला व आरोपीला त्याच्या चिखलगाव येथील राहत्या घरातून अटक केली. प्रकरणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे व अविनाश बनकर करीत आहे.
हे देखील वाचा: