जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात सर्वत्र कोरोना रोगावरील लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे . लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावून आहेत. सदर लसीकरणासाठी दिव्यांग नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात या लसीकरण केंद्रावर उपस्थित असतात.
त्यामुळे बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. दिव्यांगांना जास्त वेळ रांगेत थांबणे शक्य नाही. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ देण्यासाठी राज्यात सर्वत्र सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी स्माईल फाउंडेशनने केली आहे .
तरी राज्यातील सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी साठी तातडीने योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांना तसे आदेश देण्यात यावेत. अशी विनंती एका निवेदनाद्वारे स्माईल फाउंडेशनचे संस्थापक सागर देविदास जाधव यांनी केली. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्र्यांना वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा