दिलासा: कोरोना रुग्णसंख्येचा दर आला अवघ्या 8 टक्यांवर

आज तालुक्यात 968 पैकी 80 पॉझिटिव्ह, रास येथे 20 पॉझिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 18 मे रोजी तालुक्यात 80 पॉझिटिव्ह आढळलेत. यात शहराती 18 तर ग्रामीण भागातील 61 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात रासा येथे सर्वाधिक 20 रुग्ण आढळलेत. याशिवाय आज 98 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज 668 व्यक्तींचे यवतमाळहून रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. तर 280 व्यक्तींची रॅपीड ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 80 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. आज पॉझिटिव्ह येण्याचा दर हा आणखी कमी होत अवघ्या 8 टक्यांवर आला आहे. रुग्णसंख्येचा हा दर आधी 25 ते 30 टक्यांवर होता. काल हा दर 15 टक्यांवर होता. याशिवाय ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गावोगावी घेतले जाणारे कोरोना चाचणी शिबिर, ऑन स्पॉट कोरोना टेस्ट तसेच लॉकडाऊनमुळे कोरोनाचे थैमान कमी होण्यास मदत होत आहे.

वणी शहरात आलेल्या 18 रुग्णांमध्ये विठ्ठलवाडी येथे सर्वाधिक 4 रुग्ण आढळलेत. काळे ले आऊट, माळीपुरा, वसंतगंगा विहार येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. तर झेडपी कॉलनी, गुरुनगर, रंगनाथ नगर, जैन ले आऊट, रंगारीपुरा, राम शेवाळकर परिसर, जुना कॉटन मार्केट, भाग्यशाली नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

ग्रामीण भागात आलेल्या 66 रुग्णांमध्ये रासा येथे सर्वाधिक 20 रुग्ण आढळले आहेत. तर मजरा येथे 9, वांजरी व छोरीया ले आऊट येथे प्रत्येकी 5 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राजूर, घोन्सा येथे प्रत्येकी 3, सानापूर, कवडशी येथे प्रत्येकी 2 तर कोलगाव, परसोडा (साखरा), कायर, चिखलगाव, मंदर, नायगाव, बेलोरा, ब्राह्मणी, वरझडी, कृष्णानपूर, नायगाव, रांगणा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. मारेगाव येथील 1 रुग्ण वणीत पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 668 अहवाल प्राप्त झालेत. यात 70 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 280 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 10 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 441 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1565 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 574 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 56 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 453 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 56 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4957 रुग्ण आढळून आलेत. यातील 4303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त

प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!