वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली
खिरेकार यांची वणी तर रामगुंडे व ब्राह्मणवाडे यांची झरी येथे बदली
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना उपाय योजना काळात वणी तहसील कार्यालयातील 2 व झरी येथील 2 नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. वणी येथील नायब तहसीलदार व नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांच्यासह नायब तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे यांची समकक्ष पदावर झरी येथे बदली करण्यात आली. तर झरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांची वणी येथे नायब तहसीलदार पदावर करण्यात आली आहे. नायब तहसीलदार एम. के. गोल्हर यांना रोजगार हमी योजना विभागात पाठविण्यात आले आहे.
नायब तहसीलदार महेश रामगुंडे यांनी वणी न.प. मुख्याधिकारीपदाचा प्रभार मिळाल्यानंतर लॉकडाउन नियम मोडणाऱ्या मोठ्या आस्थापनावर धडक कारवाई करून 3 दिवसात अडीच लाख रुपये दंड वसूल केले होते. तसेच दंड न भरणाऱ्या दुकानाविरुद्द गुन्हा दाखल केला होता. रामगुंडे यांची झरी येथे बदली झाल्यानंतर नायब तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना वणी नगर परिषद मुख्याधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
डॅशिंग अधिकारी म्हणून खिरेकार यांची ओळख
झरी तालुक्यातील डॅशिंग अधिकारी म्हणून नावाजलेले नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांची बदली वणी येथे होताच रेती, कोळसा व खनिज माफियांची भुव्या उंचावल्या आहे. वणी तालुक्यात रेती, कोळसा व गौण खनिज तस्करांनी अक्षरशः उच्छाद मांडले आहे. तालुक्यात गौण खनिज तस्करीच्या धंद्यात अनेक राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते गुंतून आहे. त्यामुळे येत्या काळात नायब तहसीलदार खिरेकार हे झरी तालुक्याप्रमाणेच येथे कर्तव्य बजावणार की राजकीय दबावापुढे नांगी टाकणार याकडे नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
हे देखील वाचा: