जब्बार चीनी , वणीः कोरोनाकाळात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या नोंदणीकृत रुग्णवाहिकांना मोफत इंधन मिळणार आहे .वणी-यवतमाळ रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना ही सुविधा मिळणार आहे . रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीने हे दातृत्त्व दाखवले आहे.
दररोज 50 लिटरपर्यंत मोफत इंधन देण्यात येत आहे. अशी माहिती निंबाळा येथील रिलायन्स पंपचालक सुनील पाटील यांनी दिली . परिसरातील मार्गावरून जाणाऱ्या सर्वच रुग्णवाहिकांना याचा फायदा होणार आहे.
रिलायन्स बी.पी. मोबिलिटी लि.ने कोरोना रुग्णांमध्ये कार्यरत रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा दिला आहे. कोविडमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोंदणीकृत रुग्णवाहिकांना देशातील 1421 रिलायन्स पेटोल पंपांवरुन दररोज 50 लिटर इंधन निशुल्क देण्याचे त्यांनी ठरविले आहे.
वणी तहसीलमधील निंबाळा रोड येथील रिलायन्स पेट्रोल पंपांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून अनेक रुग्णवाहिका चालक रोज या सुविधेचा लाभ घेत आहेत. या संदर्भात कंपनीच्या आदेशानुसार कोविडसाठी कार्यरत खासगी आणि सरकारी रुग्णवाहिकांना दररोज 50 लिटर पेट्रोल डिझेल दिले जात आहे. ही सुविधा 30 जूनपर्यंत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त कोविड अॅम्ब्युलन्स धारकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान पाटील यांनी केले आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….
हेदेखील वाचा