मारेगाव तालुक्याला दिलासा, आज केवळ 1 रुग्ण

19 रुग्णांची कोरोनावर मात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 27 मे रोजी तालुक्यात अवघा 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. ही रुग्ण ग्रामीण भागातील काहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आज आरोग्य विभागाने 77 व्यक्तींचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात केवळ 1 पॉझिटिव्ह आढळला आहे. तसेच आज 158 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तपासणी करिता यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. तसेच 759 व्यक्तीचे रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यात सध्या 150 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 21 रुग्ण उपचार घेत आहे तर 118 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेत कोविड हेल्थ सेंटरवर 6 तर 5 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.आज 19 रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढत होती मात्र आता दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर गेल्या आठवड्याभरा पासून मारेगाव शहरात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने मारेगाव करांना दिलासा मिळत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात 7 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येचा दर आला 1.5 टक्यांवर

 

Leave A Reply

Your email address will not be published.