ग्रामीण पत्रकार संघाने वाचविले मुक्या जनावराचे प्राण
अपघातात जखमी होऊन पडला होता रस्त्याच्या कडेला
नागेश रायपुरे, मारेगाव: येथील विश्रामगृहा जवळ महामार्गाच्या कडेला एक मुके जनावर (गोर)अपघातात एका पायाने गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या कडेला दोन दिवसांपासून पडून नरकयातना भोगत होते. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ही बाब ग्रामीण पत्रकार संघाच्या लक्षात येताच त्या अज्ञात मुक्या जनावरावर तत्काळ उपचार करून त्याचे अखेर प्राण वाचविण्यात ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावला यश आले.
दोन दिवसांपूर्वी मारेगाव येथील विश्रामगृहाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक अज्ञात जनावर (गोर) अपघातात गंभीर जखमी होऊन महामार्गाच्या कडेला पडून होता. या अपघातात त्या जनावराचा एका पायाला गंभीर मार लागून पाय मोडल्याने त्याला चालता फिरता येत नव्हते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष जाईल आणि माझे प्राण वाचवतील या बेताने ते मुके जनावर हंबरडा फोडत ओरडत होते. मात्र महामार्गावरून येणारे जाणारे व्यक्ती त्या जखमी जनावराकडे पाहत समोर जात होते. त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. ही बाब ग्रामीण पत्रकार संघाचे सहसचिव श्रीधर सिडाम व सचिव नागेश रायपुरे यांच्या लक्षात येताच त्या मुक्या जनावराला रामकृष्ण कोवे, निशांत प्रमोद गिणगुले आदींची मदत घेऊन, महामार्गाच्या कडेला नालीत पडून असलेल्या त्या जखमी जनावराला विश्रामगृहाच्या सुरक्षित जागेवर आणले. त्याला चारा पाणी घातले.
दरम्यान स्थलांतरित पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बारस्कर यांना या घटनेची माहिती देताच त्यांनी पशुचिकित्सालयचे पट्टीबंधक अरुण जांभुळकर यांना घटनास्थळी पाठवले. अरुण जांभुळकर यांनी त्या मूक जनावराच्या पायाचे ऑपरेशन केले. त्याचे प्राण वाचविण्यास ग्रामीण पत्रकार संघाला यश आले. त्या जखमी जनावरावर औषध उपचार,चारा पाणी पत्रकार संघ करत आहे.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे नागेश रायपुरे, श्रीधर सिडाम, ज्योतीबा पोटे, अशोक कोरडे, माणिक कांबळे, प्रा.डॉ.माणिक ठिकरे, देवेंद्र पोल्हे, भास्कर धानफुलें, रमेश झिंगरे, सुरेश नाखले, उमर शरीफ तसेच संतोष रोगे, रामकृष्ण कोवे आदींनी परिश्रम घेतले.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा