वणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे

विदर्भात होता समुद्र, मोहुर्ली-बोर्डा जवळ आढळलीत स्ट्रोमाटोंलाइटचे दुर्मीळ जीवाश्म

0

निकेश जिलठे, वणी: वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अती प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. या जीवाश्मांना विज्ञानाच्या भाषेत स्ट्रोमाटोंलाइट असे म्हटले जाते. ही जीवाष्मे पृथ्वीवरील पहिले जीवाश्मे मानले जाते. 150 ते 200 कोटी वर्षांपूर्वीचे हे जीवाश्मे आहेत. मुळचे वणी तालुक्यातील व सध्या चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी हे दुर्मिळ जीवाश्मे शोधून काढली आहेत. त्यांना ही जीवाश्मे वणी जवळील मोहुरली – बोर्डा परिसरात चुनखडकामध्ये आढळली आहेत. ते गेल्या 2 वर्षापासून ही जीवाश्मांचा शोध घेत होते. प्रथम आस्ट्रेलिया मध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती. आता वणी परिसरातही ही जीवाश्मे आढळले आहेत. या संशोधनामुळे वणीला महत्त्व येऊ शकते. प्रा सुरेश चोपणे यांनी याआधी आपल्या विदर्भात असणारे डायनासोरचे अवशेष शोधून काढले होते. 

पृथ्वीची उत्पत्त्ती ही 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली. परंतु सजीवांची उत्पत्ति 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत. त्यांना स्ट्रोमाटोंलाईट (Stromatolite)असे म्हणतात. या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया ( Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.

तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वी वरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन जगत होती. पुढे अश्याच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला. चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. ह्या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात.

पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आणि चिखलांचे रुपांतर चुनडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पस्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली – बोर्डा परिसरात आढळली असल्याचे प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सांगितले .

प्रा सुरेश चोपणे हे मुळचे वणीचे असून ते ह्या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्मे शोधून काढली होती. 15 वर्षापूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा त्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्यात त्यांनी 5 ठिकाणी पाषाण युगीन स्थळे तर 4 ठिकाणी कोट्यावधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली.
चंद्रपूर येथे त्यांनी स्वताचे शैक्षणिक दृष्ट्या ‘अश्म,जीवाश्म संग्रहालय ‘ स्थापन केले आहे. चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्वाची स्ट्रोमाटोंलाइट ची जीवास्मे प्रथमच त्यांना आढळली आहेत. ते गेल्या 2 वर्षापासून ते ही जीवाश्मे शोधत होते.

या संशोधनामुळे जगभरात वणीला महत्त्व आले: प्रा. सुरेश चोपणे
ही जीवाश्मे प्रथम आस्ट्रेलिया मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळली होती. भारतात भोजुन्दा, राजस्तान, चित्रकुट, मध्य प्रदेश आणि चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आढळली आहेत. ह्या संशोधनामुळे वणी शहराचा प्राचीनतम भौगोलिक इतिहास कळला असून ह्यामुळे वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. ह्या जीवाष्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भुशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालनां मिळेल.
: प्रा. सुरेश चोपणे, भुशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक

हे देखील वाचा:

गप्पा टप्पा: खडकांशी आणि डायनासोरशी बोलणारा शास्त्रज्ञ

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.