सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील बहुप्रतिक्षित सिमेंट प्रकल्पाच्या भवितव्यावर अंधाराचे सावट पसरले आहे. निर्माणाधिन सिमेंट प्रकल्प क्षेत्र टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य-ताडोबा-अंधारी आणि कावळ व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र कॉरीडोरमध्ये येत असल्याची तक्रारी अनेक वन्यजीव प्रेमी व संस्थांकडून करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्पाच्या मंजुरीबाबत फेरविचार करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यीय समिती स्थापन केली. ही सत्यशोधन समिती 16 जून रोजी मुकुटबन येथे धडकली व वाघरा भ्रमण कॅरीडॉरल बाधित तीनही क्षेत्रातील पाहणी केली.
सत्यशोधन समिती आल्याची माहिती मिळताच झरी तालुका युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते समितीला भेटण्याकरिता पोहचली व केंद्र सरकारच्या व राज्यसरकारच्या पर्यावरण व सौरक्षण विषयक परवानग्या व नाहरकत निर्माधिन प्रकल्पास प्राप्त झालेले आहे. तसेच काही महिन्यात सिमेंट उत्पादन सुरू होण्याची चिन्हे आहे. प्रधान मुख्य वन संरक्षण (वन्यजीव) वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या विविध सायंसेव संस्था व पर्यावरण प्रेमींनी वन्यजीवांच्या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र अप्राप्त असण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने संशोधन समिती स्थापन करण्यात आली.
झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून औद्योगिक दृष्टया मागासलेला तालुका आहे. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा औद्योगिक प्रकल्प आख्याने व सुरु होण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील बेरोजगार तरुण युवकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. सिमेंट प्रकल्प सुरू झाल्यास तालुक्यातील 3 हजार युवकांना रोजगार मिळणार व सिमेंट फॅक्टरीत 12 हजार लिक काम करणार असलयाची माहिती समितीला देण्यात आली.
प्रकल्प सुरू झाल्यास बेरोजगार युवकांना रिजगर मिळेल, आदिवासी व गरीब लोकांचे राहणीमान बदलेल, गावाचा विकास होणार,दळणवळण च्या साधनांमध्ये विकास होईल, बाजारपेठ विकसित होईल तसेच आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा वाढेल अश्याअ अनेक साधन विकासाच्या दृष्टीने वाढणार असल्याचे समितीला संफण्यात आले. त्यामुळे मुकुटबन येथील प्रकल्प सुरू व्हावा तसेच वन्यजीवांचे सुद्धा संरक्षण व्हावे याकरिता तालुका युवक काँग्रेसने पुढाकार घेऊन यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू येल्टीवार व बाजार समितीचे संचालक तथा काँगेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
त्यावेळी प्रकाश कासावार, संगीता नाकले, सुनील ढाले, मिथुन सोयाम, मीना आरमुरवार, वासुदेव विधाते, भांगी लोढे, करमचंद बघेले, निलेश येल्टीवार, सचिन डहाके, डॉ मारोती मासिरकर, संतोष जंगीलवार, राहुल दांडेकर,हरिदास गुर्जलवार, भालचंद्र बरशेट्टीवार, रमेश संसनवार, संतोष नेलावर, गजानन तोटावर व संतोष अडपवार उपस्थित होते. विशेष म्हणजे प्रकल्प सुरू राहण्याकरिता तालुक्यातील मुकुटबन, मांगली, गणेशपूर (खडकी), दिग्रस, येदलापूर, माथार्जुन टाकळी या ग्रामपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी असोसिएशन तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण तज्ञ वासुदेव विधाते यांनी समितीला निवेदने देऊन सिमेंट कारखाना सुरू राहण्याकरिता विनंती केली आहे.
हे देखील वाचा: