तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन
वाढत्या महागाईविरोधात केंद्र व राज्य सरकारविरोधात निदर्शने
जब्बार चीनी, वणी: देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिजेल पाठोपाठ आता खाद्यतेल आणि इतर गोष्टींचेही दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे असा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे वणीत आज सोमवारी दिनांक 21 जून रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी करत यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
देशातील पेट्रोल डीझलचे दर तात्काळ कमी करावे, कोरोना काळातील सर्व वीज बिल माफ करण्या यावे, खाद्यतेल व जीवणाश्यक वस्तूचे दर कमी करावे, कोरोना काळात ज्या ज्या घटकांना आर्थिक फटका बसला आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रती 5 लाख रुपये मदत द्यावी, कोरोना काळात भाजी, फळ,फुले, व इतर उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांची भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना लागणारे बी- बियाणे, रासायनिक खतांचा दर कमी करावे. आदी मागण्या या निवेदनातून करन्यात आल्या आहे.
यावेळी मंगल तेलंग, दिलीप भोयर, विप्लव तेलतुबडे, किशोर मून, कपिल मेश्राम, सुभाष लसन्ते, निशिकांत पाटिल, मिलिंद पाटील, बाळू निखाडे, दादाजी घडले, रामटेके, ओमेश परेकर, भरत कुमरे, सुषमा दुधगवळी, प्रतिभा मडावी, उराडे यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचलंत का?