पोस्ट ऑफिसच्या गेस्टरूममध्ये कर्मचा-याची आत्महत्या

पोस्ट ऑफिस बंद करण्याच्या वेळी घटना उघडकीस

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या गेस्ट रुममध्ये एका कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतकाचे नाव बबन उर्फ ओंकार काशीनाथ पाचभाई (वय अंदाजे 45) असून ते विठ्ठलवाडी येथील रहिवाशी होते. एका कर्मचा-याने कार्यालयातील आवारातच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

ओंकार पाचभाई हे पोस्टाचे कर्मचारी होते. शिंदोला माइन्स पोस्ट ऑफिसमध्ये ते सब पोस्टमास्टर या पोस्टवर कार्यरत होते. आज सोमवारी दिनांक 21 जून रोजी सकाळी ते शिंदोला माईन्स पोस्टात गेले होते. मात्र कार्यालयात लिंकची समस्या असल्याने ते 10.30 वाजताच्या सुमारास शिंदोल्याहून वणी येथील टिळक चौक स्थित मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये कार्यालयीन कामासाठी आले.

Birthday ad 1
Birthday ad 2

पोस्ट ऑफसच्या वरच्या माळ्यावर गेस्ट रूम आहे. तिथे कुणीच राहत नसल्याने ते रिकामेच असते. 11.30 वाजताच्या दरम्यान त्यांनी कार्यालयातील काम उरकले व ते वरती गेस्टरूममध्ये गेले. संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोस्ट ऑफिस बंद करण्याच्या वेळी एक कर्मचारीवर गेस्ट रुममध्ये गेला असता त्यांना वर ओंकार पाचभाई यांनी फॅनला गळफास घेतलेला आढळला. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. वरिष्ठांना याची माहिती त्वरित पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. कार्यालयातील काम उरकून त्यांनी लगेच आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. 

त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र निकटवर्तीयांकडून मिळालेल्या मााहितीनुसार काही वर्षांपूर्वी ते आजारी पडले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना प्रकृती बरी नसल्यासारखे वाटत होते. त्यातून ते तणावात असायचे. सुटी घेऊन उपचार करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र त्याआधीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याशिवाय त्यांच्यावर कर्ज असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र आत्महत्येचे खरे कारण तपासानंतर कळू शकेल. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
(अधिक माहिती येताच ही बातमी अपडेट केली जाईल.)

हे देखील वाचलंत का?

ब्राह्मणी फाट्याजवळ दारुची तस्करी करणा-याला अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!