जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लाठी येथे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन मंगळवार 22 जून रोजी करण्यात आले. उपकेंद्र स्तरावर आयोजित या शिबिरात 100 स्त्री पुरुषांचे यशस्वी लसीकरण झाले. लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण व्हावे याची जवाबदारी गावातील ग्रामपंचायतीची असेल असे शासकिय आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
त्याच आदेशानुसार लाठी येथे लसीकरण शिबिर आयोजित करण्यातआले. 670 लोकसंख्येचे लाठी गावातील उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची लस घेण्यास सोयीस्कर झाले आहे. यावेळी गावातील 30 वर्ष वयोगटावरील लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहीत करण्यात आले.
गावात प्रत्येकानं कोविड ची लस घेण्याचे आव्हान तलाठी सुजाता वासनिक, पोलीस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामसेवक सुनीता कातकडे , उपसरपंच अभिजीत यादव, ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर, रीना लाडे, मुख्याध्यापक गेडाम, गुलाब आवारी, अंगणवाडी सेविका मीरा माहुरे, ज्योती मांडवकर यांनी केले. तर आरोग्य विभागाच्या कर्मचारी कुसुम बाराहाते, मदतनीस चंद्रकला कनाके, प्रवीण आस्वले, किशोर लखमापुरे यांनी लसीकरण शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कर्तव्य बजावले.
हे देखील वाचा:
मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी