मारेगाव येथील प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरणी मृतकाकडे सापडली चिठ्ठी

2 संशयीत चौकशीसाठी ताब्यात

0
Jadhao Clinic

नागेश रायपुरे, मारेगाव:आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास प्रमोद किसन ठेंगणे (35) या तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी मृतकाच्या खिशात सुसाईड नोट (चिठ्ठी) सापडली आहे. त्यावरून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी भूमिका मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. 

मृतक प्रमोद हा शहरातील प्रभाग क्र. 4 मधील रहिवाशी होता. आज दिनांक 23 जून रोजी दुपारी 2.30 वाजता दरम्यान महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला प्रमोदचा मृत्यूदेह दोरीने गळफास घेऊन आढळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याचे काम बंद झाले होते. त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसा पासून आर्थिक विवेचनात होता, अशी माहिती प्रमोदच्या निकटवर्तीयांचे म्हणणे होते.

दरम्यान मृतकाच्या खिशात चिठ्ठी (सुसाईड नोट) आढळली आहे. प्राथमिक माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये काम बंद असल्याने तो जवळच्या एका किराणा दुकानातून किराणा माल घ्यायचा. त्याची उधारी अधिक झाली होती. पैशासाठीच्या सततच्या तगाद्यामुळे तो मानसिक तणावात होता अशी माहिती मिळत आहे. या प्रकरणी 2 संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून त्यांची चौकशी सुरू आहे. ही संख्या वाढू शकते असे बोलले जात आहे.

एका आठवड्यातच प्रभाग 4 मध्ये सलग दुसरी घटना
येथील प्रभाग क्र. 4 मध्ये 18 जून च्या सायंकाळी प्रवीण परसुटकर या अविवाहित युवकाने राहत्या घरी वायर ने गळफास घेतला होता. आज पुन्हा याच प्रभागातील प्रमोद ठेंगणे या विवाहित तरुणाने सुद्धा गळफास घेवुन आत्महत्या केली. एका आठवड्यातच परिसरातील दोन व्यक्तींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने प्रभाग क्र 4 चे रहिवाशी हादरले आहे. प्रमोदच्या पश्चात पत्नी, 7 वर्षाच्या मुलगा व आई आहे.

हे देखील वाचा:

स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!