शशिकांत निमसटकर कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी
मारेगाव तालुक्यात पहिल्यांदाच मिळाला जिल्हाध्यक्षपदाचा मान
नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची नुकतीच यवतमाळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा कार्यकारनी गठीत करण्यात आली. यात मारेगाव येथील शशिकांत निमसटकर यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष पदी महागाव येथील सुदर्शन गोस्वामी, कार्याध्यक्ष पदी यवतमाळ येथील मंगेश ढेकळे,सचिव पदी सुधीर चव्हाण (पुसद), सहसचिव उमेश चांदेकर (राळेगाव), कोषाध्यक्ष प्रशांत प्रभाते (दारव्हा), संघटक राहुल काळे (केळापूर) तर महिला विभागीय संघटक अमरावती विभाग पदी शारदा गायमुखे (पुसद), महिला जिल्हाध्यक्ष पदी छाया दरोडे(राळेगाव), संगीता काळे, रविना धुळध्वज यांची नियुक्ती करण्यात आली.
पहिल्यांदाच मारेगाव तालुक्याला जिल्हाध्यक्षपदाचा मान
शशिकांत निमसटकर यांनी संघटनेच्या माध्यमातून कोतवांल बांधवांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या. नागपूर, मुंबई येथील प्रत्येक आंदोलनात ते सहभागी झाले. जिल्ह्यातील संघटना मजबूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्याची कार्यप्रणाली पाहून जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. मारेगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यादांच कोतवाल संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची तालुक्यातील व्यक्तींच्या गळ्यात पडली आहे. त्यांच्या निवडीने परिसरात कौतुक होत आहे.
हे देखील वाचा: