सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकी व खडकडोह येथे अवैधरित्या गुटका व प्रतिबंधीत तंबाकू विक्री करणाऱ्या तीन दुकानात छापा मारण्यात आला. यात 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकऱणी तिन्ही आरोपीेंवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वप्रथम मुकुटबन पोलिासांनी 24 जून रोज दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खडकी येथे धाड टाकली. खडकी येथील गुटका सप्लायर धनराज धांडे यांच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रतिबंधीत असलेला ईगल तंबाखूचे 40 ग्रामचे 10 पॉकेट ज्याची किंमत 4 हजार 860 व 200 ग्रामचे 4 पॉकेट ज्याची किंमत 1 हजार 80 व अंनी कंपनीची स्वीट सुपारी पॉकेट ज्याची किंमत 11 किंमत 660 रुपये असा एकूण 6 हजार 800 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
तिथून पोलिसांनी खडकडोहकडे वळले व येथील दुकानदार प्रदीप गारघाटे वय 42 यांच्या दुकानात धाड टाकून झडती घेतली असता त्यांच्याकडे प्रतिबंधीत असलेला मजा 108 कंपनीच्या तांबखूचे 50 ग्रामचे 17 डब्बे किंमत 3247, गुलाबी स्वीट सुपारी 28 पॉकेट 1820 रु असा एकूण 5067 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खडकडोह येथीलच राजू उपरे याच्याही दुकानात धा़ड टाकून दुकानाची झडती घेतली असता दुकानातून अनि गोड सुपारी 20 पॉकेट किंमत 1200 रुपये, चौपाटी गोड सुपारी 420 रुप, रितीक गोड सुपारी 10 पॉकेट 600 रु, महेक गोड सुपारी 8 पॉकेट 480 रु, रोज गोड सुपारी 3 पॉकेट 180 रुपये असा एकूण 2880 रुपयाचा माळ जप्त करण्यात आला.
खडकी व खडकडोह येथील तीनही दुकानातून 15 हजार 300 रुपयांचा माल जप्त करून ठाण्यात जमा करण्यात आला. 25 जून रोज पोलिसांनी ड्रॅग एन्ड फूड विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रचार करू जप्त केलेल्या तंबाखू व सुपारी याची पाहणी केली असता सदर तंबाखू व गोड सुपारी ही बोगस व मानवाच्या शरीराला हानिकारक असून केमिकल मिश्रीत असल्याचे आढळले.
त्यामुळे फूड अँड ड्रग्जच्या अधिकारी यांनी स्वतः फिर्याद देऊन तीनही दुकांदारावर कार्यवाहीची मागणी केल्यावरून 25 जूनला खडकी येथील धनराज धांडे, खडकडोह येथील प्रदीप गारघाटे व राजू उपरे यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम 188, 272, 273 सह कलम अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 59 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, शशिकांत नागरगोजे, खुशाल सुरपाम, ऋषी ठाकूर, प्रवीण तालकोकुलवार यांनी केली तर तपास मोहन कुडमेथे व रंजना सोयाम करीत आहे.
हे देखील वाचा:
[…] […]