पूरग्रस्तांना वणीतील शिक्षक व करियर अकॅडमी तर्फे मदतीचा हात
वर्गणी गोळा करून पूरग्रस्तांना मदत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड यासारख्या जिल्ह्यातील गावांची अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली.या गावांना शिक्षक मित्र परिवार पं.स.वणी, उडाण फिजिकल करियर अकॅडमी, I can करियर अकॅडमी, युवा नवरंग क्रीडा मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने वणी शहरातून मदतनिधी गोळा करण्यात आला व सदर निधी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पूरग्रस्तांना पाठवण्यात आला.
या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रातील गावच्या गावे नष्ट झाले. काही गावातील घरे, शेती यांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी वणी शहरातून शिक्षक व करियर अकॅडमी यांच्या प्रयत्नातून ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत मदत निधी गोळा करण्यात आला.
वणी तालुक्यातील शिक्षक तसेच अकॅडमीचे मार्गदर्शक व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत आर्थिक निधी गोळा करण्यासाठी वणी शहरातील शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक ते गांधी चौक ते गाडगे महाराज चौक ते टागोर चौक ते आंबेडकर चौक ते शिवाजी महाराज चौक इथे समारोप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार महेश लिपटे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक राजेंद्र साखरकर, गणेश आसुटकर, राजेश पहापळे, सोपान लाड, योगेंद्र शेंडे, लांजेवार, धीरज तायडे, प्रशांत आवारी, विनोद उईके, ज्योती ढाले, विणा पावडे, सारिका वैरागडे यांनी परिश्रम घेतले. गोळा झालेला निधी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पूरग्रस्तांना पाठवण्यात आला.
हे देखील वाचा:
वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू
अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यूकेजी, एलकेजीसाठी प्रवेश निश्चित