भास्कर राऊत, मारेगाव: शेतात कामाला गेलेल्या एका विधवा महिलेचा एका सोळा वर्षीय विधिसंघर्ष (अल्पवयीन) बालकाने विनयभंग केला. आज शनिवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सगणापूर येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित विधवा महिला (29) ही गावातच तिच्या मुलासह राहते. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे घरची शेती पीडिताच सांभाळते. गावातच विधीसंघर्ष बालक (16) बालक राहतो. सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास महिला शेतीच्या कामासाठी शेतात जात होती.
दरम्यान विधीसंघर्ष बालक देखील शेतात बैल चारत होता. त्याला पीडित विधवा ही शेतात जाताना दिसली. एकटी महिला पाहून हा बालक तिच्या मागे जाऊन तिचा विनयभंग केला. या गडबडीत महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. महिलेने आरडाओरड करताच विधीसंघर्ष बालक तिथून पळून गेला.
महिला तातडीने घरी आली व तिने तिच्या नातेवाईकांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.