बेंबळाने बांधलेल्या पुलावर पावसाने झाली घसरपट्टी

अनेक वाहनचालक पडले घसरून, अधिकारी, ठेकेदारांचे दुर्लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाने बांधलेल्या पुलावर सतत पडत असलेल्या पावसामुळे चिखल साचले असून या चिखलामुळे पुलावरून जाणारे येणारे अनेकजण पडले असल्याच्या घटना घडल्या असल्या तरीही याकडे बेंबळा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

मारेगाव तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्पाचे काम मोठया धडाक्यात सुरू आहे. भर पावसाळ्यात या प्रकल्पातर्फे पुलांचे काम करण्यात आले. मार्डी ते मारेगाव या रस्त्यादरम्यान किन्हाळा या गावाजवळ नुकतेच दोन पुलांचे काम करण्यात आले. पूलाचे कामाचे वेळेस कॉलमसाठी खड्डे खोदल्या गेले तेव्हा त्या खड्यामधील बाहेर निघालेली माती रस्त्यावरच ठेवलेली होती. तसेच भर टाकण्यासाठी मुरूम पुलाचे जवळच टाकलेला होता.

पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाजूला तसेच रस्त्यावर असलेली माती हटविण्यात यायला हवी होती. परंतु प्रशासनाचा वेळकाढूपणा आणि बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांचे याकडे असलेले कायमचे दुर्लक्ष यामुळे याठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही माती तशीच साचून आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्यावरून वाहन चालवताना अनेकांना गाडी घेऊन पडल्यामुळे आर्थिक तसेच शारीरिक नुकसान सोसावे लागलेले आहेत.

रिमझिम पाऊस जरी आला तरी येथे घसरपट्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. परिसरातील नागरिक मात्र हे सगळे निमूटपणे सहन करीत आहे. याकडे बेंबळा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.

हे देखील वाचा:

खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.