जितेंद्र कोठारी, वणी: येथील मंगलम पार्कमधील आर. के. अपार्टमेंट येथे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. बुधवार 29 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन बुकींना खायवळी करताना अटक केली. पोलिसांनी अपार्टमेंटमधून 3 लॅपटॉप आणि 3 मोबाईल हँडसेट जप्त केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना मंगलम पार्कमध्ये क्रिकेट जुगार सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीवरून व्यूहरचना आखून एसडीपीओ पथक आणि वणी पोलिसांनी मंगलम पार्क स्थित आर.के. अपार्टमेंट -2 मधील 303 नंबरच्या फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटमध्ये दोन व्यक्ती लॅपटॉप व मोबाईलवर आयपीएलच्या दुबई येथे सुरु राजस्थान रॉयल विरुद्द रॉयल चॅलेंजर बंगलोर या क्रिकेट सामन्यावर बेटिंग करताना आढळले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विराज उर्फ विरु बदकी (24), रा. खातीचौक व दिनेश तुळशीराम नागतुरे (35), रा. भोईपुरा वणी अशा दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपीविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम कलम 4, 5 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक आनंद पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे, इकबाल शेख, रवी इसनकर, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, संतोष कालवेलकर यांनी पार पाडली.
एका आठवड्यातील दुसरी कारवाई
गेल्या आठवड्यात क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाडीची ही दुसरी कारवाई आहे. 24 सप्टेंबरला गुरूनगर भागात एका घरात क्रिकेट बॅटिंगवर जुगार खेळताना दोघांना पोलिसांनी अटक केली होती. वणी शहरात क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणावर जुगार खेळले जाते. जिल्ह्यातीलच नव्हे तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर व तेलंगणा राज्यातील सट्टा चालक वणी येथील बुकीकडे उतराई व खायवळी करतात. आयपीएलच्या एका सीझनमध्ये वणीत क्रिकेट बॅटिंगवर करोडों रुपयांची उलाढाल होते.
हे देखील वाचा:
12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
Comments are closed.