सराईत गुन्हेगार गब्ब्या पोलिसांच्या जाळ्यात

सिनेस्टाईल पाठलाग करून अटक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सराईत गुन्हेगार गब्ब्या उर्फ नावेद मो. कादिर (39) रा. मोमीनपुरा यास दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केली आहे. गब्ब्यास मंगळावारी 21 डिसेंबर रोजी वणी शिरपूर रोडवरून एक मालवाहू वाहन व इतर मालासह अटक करण्यात आली आहे.

सराईत गुन्हेगार गब्ब्या हा काही चोरीची गाडी, भंगार व चोरीचे तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली मंगळवार 21 डिसेंबर रोजी मिळाली. वणी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी घटनास्थळी बघितले असता वणी शिरपूर रोडवर गब्ब्या हा एका मालवाहू गाडीत असल्याचे दिसले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला.

पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून मालवाहू गाडी क्रमांक MH29 T3416, भंगार व 7 कट्टे 25 ते30 किलो वजनाचे तांदूळ असा एकूण 3 लाख 66 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्यावर कलम 379, 461, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदरची कारवाई पोलोस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पूज्जलवार उपविभागीय पोलीस अधीकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या आदेशावरून सपोणी माया चाटसे, पोउनी शिवाजी टिपूर्णे, पोऊनी डीबी पथक कर्मचारी सुदर्शन वनोळे, हरींद्र भारती, अविनाश बनकर यांनी केली.

हे देखील वाचा:

मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता

Comments are closed.