पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सकाळी पाच वाजता संत गाडगेबाबा चौक वणी, ब्राह्मणी फाटा व संत गाडगेबाबा स्मारक स्थळी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. तर ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.
पहाटे वणीतील संत गाडगेबाबा स्मारक स्थळी गाडगेबाबांच्या मूर्तीला हार टाकून अभिवादन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ वणी तर्फे बाबांचे आवडते भजन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला याचे सादरीकरण करण्यात आले. दुपारी संत गाडगेबाबा चौकात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
संत गाडगेबाबा स्मृतिदिनाला ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्याची परंपरा सन 1998 पासून सुरू आहे. या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला. सकाळी संपूर्ण रुग्णांना व नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय देरकर, प्रवीण खानझोडे, विनोद ढुमने, डॉ सुलभेवार वैद्यकीय अधीक्षक ,डॉ भालचंद्र आवारी, डॉ विवेक गोफने, डॉ विधाते, राजू तुरणकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाचे अध्यक्ष कैलास बोबडे, उपाध्यक्ष उमाकांत भोजेकर, सचिव राहूल चौधरी, राजेश क्षीरसागर, कलावती क्षीरसागर, नरेंद्र क्षीरसागर, भास्कर पत्रकार, गजेंद्र थेटे, धनराज हिवरकर यांच्यासह जनार्दन थेटे, दिपलाल चौधरी, ज्ञानेश्वर भोंगळे, प्रवीण वाघमारे, अजय चिंचोळकर, प्रशांत महकुलकर यांनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा:
मारेगाव नगर पंचायत निवडणूक: चुरशीच्या निवडणुकीने वाढवली मतदानाची टक्केवारी
Comments are closed.