प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून
राजूर येथील मर्डर मिस्ट्रीचा अवघ्या 3 दिवसांमध्ये उलगडा
जितेंद्र कोठारी, वणी: राजूर (कॉलरी) येथे चुनाभट्टी कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाचा वणी पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात उलगडा केला. मृतक चुनाभट्टी सुपरवायझर अतुल खोब्रागडेच्या प्रेयसीनेच तिच्या भाटव्याच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. हत्येच्या आरोपाखाली विवाहित प्रेयसी व तिच्या बहिणीच्या नवऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे.
मृतक अतुल सहदेव खोब्रागडे (40) हा अविवाहित होता. राजूर येथील हाजी लाईम फॅक्टरीमध्ये सुपरवायझर म्हणून तो काम करीत होता. हाजी लाईम फॅक्टरी पासून काही अंतरावर दुर्गमवार यांचा चुनाभट्टा आहे. त्या चुनाभट्टीवर सोनू (24) नावाची महिला काम करते. चुनाभट्टी परिसरात मजुरांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या राहुटीमध्ये ती महिला आपल्या दोन लहान मुलांसह राहते. सोनूचे महिला मजुरसोबत अतुलचे मागील काही वर्षांपासून प्रेम संबंध होते.
अतुल प्रेहसी सोनूला भेटायला नेहमी तिच्या घरी जायचा. घराशेजारीच आरोपी रविवार दि 19 डिसेंम्बर रोजी अतुल आपल्या प्रेयसी सोनुला भेटण्यासाठी तिच्या खोलीवर गेला होता. खोलीपासून जवळच सोनूचा भाटवा हर्षद अंबादास जाधव (40) राहतो. त्याला साळीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती होती. मात्र त्याला या दोघांचे प्रेमसंबंध खटकायचे.
रविवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी अतुल हा प्रेयसी सोनूला भेटण्यासाठी गेला होता. तिथे आरोपी हर्षद पोहोचला होता. तिथे त्या दोघांचा अतुलसोबत वाद झाला. या वादातून आरोपींनी अतुलच्या तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. मृत्यू संशयास्पद वाटण्यासाठी त्यांनी मृतदेह घराच्या समोरी अंगणात ठेवला.
सोमवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान अतुलचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याच्या पायातील डाव्या पायातील जोडा हा उजव्या पायात तर उजव्या पायातील जोडा डाव्या पायात होता. मोबाईल छातीवर आढळून आला तर स्वेटर मृतदेहाच्या बाजूला आढळून आले. त्यामुळे हा संशयास्पद मृ्त्यू असल्याचा प्राथमिक अंदाज होता. पीएम रिपोर्टमध्ये सदर मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या दिशेने तपासाला सुरूवात केली.
फिंगरप्रिंटने फोडले भिंग
चुनाभट्टीवर काम करणाऱ्या इतर मजुरांचे बयान घेतले असता पोलिसांना सोनू व अतुलच्या प्रेमप्रकरणाबाबत कळले. या संशयाच्या आधारे मयत अतुल खोब्रागडेची प्रेमिका सोनू राजू सरवणे (25) आणि तिच्या बहिणीचा नवरा हर्षद अंबादास जाधव (40) या दोघांना ताब्यात घेतले. सतत दोन दिवस चौकशी करुनही दोघांनी अतुलची हत्या करण्याची कबुली दिली नाही. अखेर बुधवारी यवतमाळ येथून आलेले फिंगरप्रिंट एक्स्पर्ट आणि श्वान पथकाने घटनास्थळ निरीक्षण केले असता आरोपीचे बिंग फुटले.
पोलिसांना गुन्ह्याची कबुली देताना आरोपी प्रेयसी सोनू यांनी भाटवा हर्षदच्या मदतीने अतुलचा गळा आवळून व त्यानंतर उशीने तोंड दाबून खून केल्याचे सांगितले. आरोपीच्या कबुळीवरून पोलिसांनी आरोपी सोनू राजू सरवणे (25) आणि हर्षद अंबादास जाधव (40) रा. राजूर कॉलरी विरुद्द कलम 302 अनव्ये गुन्हा दाखल केले. आरोपीना आज न्यायालय समोर हजर करण्यात येईल.
विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के, सपोनि माया चाटसे यांनी अथक परिश्रम घेऊन या ‘ब्लाइंड मर्डर’ प्रकरणाचा उलगडा फक्त दोन दिवसात करून आरोपीना अटक केली.
हे देखील वाचा:
Comments are closed.