मेघा इंडेनच्या संचालिकाआशा जैन यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू येथे झाले निधन

जितेंद्र कोठारी, वणी:  वणी येथील इंडेन गैसचे अधिकृत वितरक मेघा इंडेन गैस एजन्सीची संचालिका श्रीमती आशा जैन (60) यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने बंगळूरु येथे निधन झाले.  बंगळुरू येथील मनीपाल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवार 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र आघात होऊन त्यांची प्राणज्योत माळवली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये छोटे मोठे व्यवसाय करून त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे उदरनिर्वाह व शिक्षण पूर्ण केले. मेघा इंडेन गैस एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायात उंच भरारी घेतली. यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांची नोंद वणी परिसरात होती. मागील तीन महिन्यापासून त्यांना हृदयविकारचे आजार जडले होते. त्यांच्या मागे दोन विवाहित व एक अविवाहित मुली तसेच आप्त परिवार आहे. श्रीमती आशा जैन यांचे अंत्यसंस्कार बंगळुरू येथेच करण्यात येणार आहे. वणी बहुगुणी परिवारातर्फे आशा जैन यांना भावपूर्ण श्रद्धांजली ….   

Comments are closed.