निधन वार्ता: पांडुरंग प्रेमलवार यांचे निधन

रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे माजी संचालक व व्यावसायिक म्हणून ओळख

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे माजी संचालक व व्यावसायिक पांडुरंग प्रेमलवार यांचे सोमवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील होते. काही वर्षांआधी ते वणीत व्यवसायानिमित्त आले व तिथेच स्थायिक झाले. त्यांचे गांधी चौकात कपड्याचे दुकान होते. साधी राहणी व मितभाषी स्वभाव अशी त्यांची ओळख होती. त्यांनी काही काळ रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे संचालकपदही भूषवले होते. माजी नगरसेविका निर्मला प्रेमलवार यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडं असा आप्त परिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.