जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर येथे शनिवार 8 ऑक्टो. रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर गायत्री मंगल कार्यालयामध्ये आयोजित या महाआरोग्य शिबिरचे उद्घाटन चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता होईल. वणी तालुका कॉंग्रेस कमेटी व शिवभक्त मंडल कायर यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वास्थ्यम सुपस्पेशीलिटी हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात येत आहे.
या शिबिरात डॉ. पंकज हरकुट, डॉ. रोहित गुप्ता (हृदयरोग तज्ञ), डॉ. प्रतीक उत्तरवार (मेंदुरोग तज्ञ), डॉ. निखिल खोब्रागडे (पोटविकार तज्ञ), डॉ. अमित देशपांडे (मूत्ररोग तज्ञ), डॉ. महेंद्र लोढा, डॉ. संचिता नगराळे, डॉ. नीलेशा बलकी (प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ), डॉ. गणेश लिमजे, डॉ. सूरज चौधरी, डॉ. रोहित चोरडिया, डॉ. शिरीष कुमरवार (मेडिसीन विभाग), डॉ. सुनील जुमनाके, डॉ. संदीप मानवटकर, डॉ. पवन राणे (बालरोग तज्ञ), डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. किशोर व्यवहारे, डॉ. अक्षय खंडाळकर (सर्जरी विभाग), डॉ. विकास हेडाऊ, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. प्रतीक कावडे (अस्थिरोग विभाग), डॉ. अनिकेत अलोणे, डॉ. स्वप्नील गोहोकर (नेत्ररोग विभाग), डॉ. विजय राठोड, डॉ. अमोल पदलमवार (दंतरोग तज्ञ), डॉ. रौनक कोठारी (फिजिओथेरपी), डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. नईम शेख, डॉ. विवेक गोफणे, डॉ. दिलीप सावनेरे (जनरल फिजीशियन) सेवा देणार आहे.
महाआरोग्य शिबिरात आवश्यक त्या तपासण्या व ईसीजी मोफत केली जाईल. गरजू रुग्णाना मोफत औषधीचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरात येताना पूर्वी चालू असलेली औषधीची चिठ्ठी सोबत आणावी लागणार आहे. कायर येथे पहिल्यांदाच आयोजित या भव्य महाआरोग्य शिबिराचे परिसरातील रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावे. असे आवाहन शिबिराचे आयोजक डॉ. महेंद्र लोढा (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी), पुरुषोत्तम आवारी (माजी सभापती व मुख्य समन्वयक महाआरोग्य शिबिर), आशीष खुलसंगे (अध्यक्ष, झरी ता. कॉंग्रेस कमेटी), प्रमोद वासेकर (अध्यक्ष, वणी ता. कॉंग्रेस कमेटी) व नंदकिशोर अंबोरे (अध्यक्ष, शिवभक्त मंडल कायर) यांनी केले आहे.
शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा – डॉ. महेंद्र लोढा
वणी तालुक्यात कोळसा खाणी, चुना भट्टा, क्रशर उद्योगामुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण होऊन नागरिकांना विविध आजार जडले आहे. ग्रामीण क्षेत्रात पुरेशा आरोग्य सेवाअभावी गरीब रुग्णांना मोठा शहरात व खाजगी दवाखान्यात उपचार करता येत नाही. वणी विधानसभा कॉंग्रेस कमेटीतर्फे यापुढे वणी, मारेगाव व झरी तालुक्यात ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
– डॉ. महेंद्र लोढा, प्रदेश कॉंग्रेस कमेटी सदस्य व मुख्य संयोजक
हजारो युवकांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश
महाआरोग्य शिबिरानिमित्त खासदार बाळूभाऊ धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत कायर परिसरातील अनेक गावातील हजारो युवा शनिवार 8 ऑक्टो. रोजी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची माहिती डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली आहे.
हे देखील वाचा:
चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा
ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार
Comments are closed.