मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोघांनी मृत्यूला कवटाळले

दोन अविवाहित युवकांच्या आत्महत्येनी तालुका हळहळला

भास्कर राऊत मारेगाव : काही काळाच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा आत्महत्यांनी डोके वर काढले आहे. जवळपास महिनाभर थांबल्यानंतर काल म्हैसदोडका येथील एका महिलेनी केलेल्या आत्महत्येची धग कमी होत नाही, तोच आज एकाच दिवशी आत्महत्येची दोन घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे. तालुक्यातील केगांव (वेगाव) व गोंडबुरांडा येथील दोन युवकांनी मृत्युला कवटाळले.

 केगांव येथील स्वप्नील राजू पाचभाई (25) हा नेहमीप्रमाणे रात्री गावात असलेल्या देवीजवळ खूप वेळपर्यंत होता. तिथून तो रात्रीच्या वेळेसच शेतामध्ये गेला. आणि मोनोसील नावाचे कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली. सकाळी स्वप्नीलचे वडील जेव्हा शेतामध्ये बैल चारायला घेऊन गेले, तेव्हा त्यांना तो निपचित पडलेला दिसला. कुटुंबाचा एकमेव आधार असलेला मुलाने आत्महत्या केल्याने कुटुंबियांच्या दुःखाला पारावार उरला नाही. मृतक स्वप्नीलच्या मागे आईवडील,विवाहित बहीण आणि आप्त परिवार आहे.

 दुसऱ्या घटनेत गोंडबुरांडा येथून मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या  दीपक देविदास रामपुरे (20) या युवकाचा मृतदेह नरसाळा येथील गिट्टी खदानमध्ये मिळाला. गिट्टी खदान मधील पानी भरलेल्या खड्ड्यात उडी घेऊन दीपकने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दीपक हा रोजीने ऑटो चालवायचा व घर सांभाळायचा. त्याचेकडे 5 एकर शेती असून शेतीमध्ये हवे तसे उत्पन्न होत नसल्याने व कर्जाचा बोझा सुद्धा वाढलेला होता. त्यामुळे नैराश्यग्रस्त  स्थितीमध्ये आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील वाचा:

वणीमध्ये सेनेची मुहुर्तमेढ करणारे शिंदे गटाला देणार उभारी ?

चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा

ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार

Comments are closed.