…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

शहरात मोकाट वराहांचा मुक्त संचार, नागरिक त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान करीत आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या वराहांमुळे वाहनाचे अपघात घडत आहे. त्यामुळे शहरात मोकाट फिरणाऱ्या वराहांचे बंदोबस्त करावा, अशी मागणी शहर महाराष्ट्र नवनर्माण सेनेनी नगरपरिषदकडे केली आहे.

Podar School 2025

वणी शहरात मोकाट वराहांच्या संख्येत वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा वाहनांसमोर वराहचे कळप येऊन दुचाकी चालकांचे अपघात घडत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने वराह मालकांना नोटीस देऊन मोकाट वराहांचा बंदोबस्त करावा किंवा मुक्त संचार करणाऱ्या वराहांना पकडुन जंगलात सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या एका आठवड्यात मोकाट वराहांचा बंदोबस्त न केल्यास नगर परिषद कार्यालयात वराह सोडण्यात येईल. असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुख्याधिकारी यांना निवेदन देताना शहराध्यक्ष शिवराज पेचे, मनसे महिला जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, माजी नगराध्यक्ष प्रिय लभाने, महिला शहराध्यक्ष विंध्या हीवरकर, ज्योती मेश्राम, धनंजय त्रिंब्यके, जितेश वैद्य, प्रकाश पिंपलकर, लोकेश लडके, गुड्डू धोटे, सारंग चिंचोलकर, वैभव पुरानकर, संकेत पारखी, सूरज भिवनकर, अंकित पिदुरकर, भोला चिकनकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

 

Comments are closed.