अतिक्रमणावर हातोडा…. अवैध होर्डिंग्सवर कधी होणार कार्यवाही?

शुभेच्छा व जाहिरात फलकाने शहराचे विद्रुपीकरण

जितेंद्र कोठारी, वणी: मागील काही वर्षांपासून फ्लॅक्स बॅनरचे प्रचलन वेगाने वाढले आहे. शहरात फ्लॅक्सबाजीला ऊत आला आहे. दादा, मामा, काका, साहेब, राजे, युवानेते, भाऊ, बंटी, बबल्या, ताई, माई, वहिनी यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी विना परवाना कुठेही लावा, कोणीही काहीही म्हणणार नाही. अशी परिस्थिती आहे. आता याबाबत उच्च न्यायालयाने या अवैध फलकबाजीवर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावर पालिका प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वणी शहरात टिळक चौक भागात राज्य उत्पादन शुल्क कार्यालय समोर, सत्यम हॉटेलच्या इमारतीवर व नगर परिषद कॉम्प्लेक्सवर तसेच बस स्थानक परिसरात काही खाजगी जाहिरात एजन्सीचे होर्डिंगस आहे. जाहिरात एजन्सीकडून ठरलेले वार्षिक कराची आकारणी नगरपरिषद दरवर्षी करत असते. तर साई मंदिर ते लोकमान्य टिळक महाविद्यालय पर्यंत स्ट्रीटलाईट पोल तसेच इतर ठिकाणी लावण्यात येणार फलकाची कर वसुलीचे कार्य खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र बस स्थानक परिसर, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बँक चौक, साई मंदिर चौक या भागात रस्त्याच्या अगदी बाजूला बल्ली व बांबूच्या साहाय्याने मोठे मोठे जाहिरात फलक अवैधरित्या लावण्यात आलेले आहे.

मागील एक आठवड्यापासून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम नगर परिषद कडून राबविली जात आहे. वाहतुकीस अडथळा असलेले सर्व अतिक्रमण पालिका पथकाकडून हटविण्यात येत आहे. दरम्यान शहरात प्रमुख चौकासह ठिकठिकाणी अवैधरित्या लावलेले फ्लॅक्स बॅनर व होर्डिंग्जवर अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. प्रशासन कडून परवानगी न घेता लावण्यात आलेले फ्लॅक्स बॅनर व होर्डिंग्जवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तसेच इलेक्ट्रिक खांब व इतर ठिकाणी लावलेले अवैध फ्लॅक्स बॅनर हटविण्यात यावे. अशी मागणी होत आहे.

हे देखील वाचा: 

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

वणीतून मिळालेल्या पिछाडीने केला दिग्गजांचा पत्ता कट ?

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.