बलात्कार प्रकरणी प्रियकरासह दोघांना 20 वर्ष कारावासाची शिक्षा

जितेंद्र कोठारी, वणी: ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. प्रेमात आणखी एक पायरी गाठत त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. एके दिवशी प्रियकर प्रेयसीला घेऊन जंगलात गेला. तिथे दोघांचे संबंध सुरु असताना अचानक दुचाकीवर तीन मित्र येतात. जोडप्याला रंगेहात पकडल्याचे फोटो काढून मुलीला शरीरसंबंध करू देण्याची मागणी करतात व मुलीवर जळजबरी अत्याचार करतात. एका सी ग्रेड मुव्हीतला हा सिन वाटत असला तरी हा सिन प्रत्यक्षात आपल्याच परिसरात घडलेला आहे. या प्रकरणी प्रियकर व त्याच्या एका मित्राला बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायालय पांढरकवडाचे न्यायाधिश पी पी नाईकवाडे यांनी हा निकाल दिला.

सदर घटना 9-10 वर्षांपूर्वीची आहे. पीडिता ही अल्पवयीन असून ती तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. 2014 मध्ये पीडिता ही वणीतील एका महाविद्यालयात 11 व्या वर्गात शिकत होती. कॉलेजसाठी ती गावाहून ऑटोने वणीत यायची. दरम्यान तिची आरोपी प्रफुल्ल धुळे (घटनेच्या वेळी वय 22) याच्याशी ओळख होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान आरोपीने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी विविध ठिकाणी शरीरसंबंध निर्माण केले.

दिनांक 27 मार्च 2014 रोजी गुरुवारी पीडिता ही कॉलेजसाठी वणीला आली होती. दुपारी मुलीचा प्रियकर देखील वणीत आला. त्याने पीडितेला बाहेर चलण्यास सांगितले. प्रियकर प्रफुल्लने प्रेयसीला मोटारसायकलवर बसवून मारेगाव रोडवरील जंगलातील एका निर्जन स्थळी नेले. तिथे दोघांमध्ये शरीरसंबंध सुरू असताना अचानक त्या ठिकाणी संदीप कुरेकार (घटनेच्या वेळी वय 26) हा त्याच्या दोन मित्रासह दुचाकीने आला. तिथे त्यांनी दोघांचे मोबाईलवर फोटो काढले व मित्राच्या प्रेयसीला शरीरसंबंधाची मागणी केली. तसेच शरीरसंबंधास नकार दिल्यास दोघांचे नको त्या अवस्थेतील फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी संदीपने मुलीवर अत्याचार केला.

झालेल्या प्रकाराने पीडिता हादरून गेली. तिने घटनेच्या 19 दिवसांनी म्हणजेच दिनांक 15 एप्रिल 2014 रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रियकर व अचानक मित्रांसह दुचाकीने आलेल्या आरोपींवर बलात्कार, पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार संरक्षण), आयटी ऍक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रज्ञा वाडकर यांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास करून सर्व आरोपींविरोधात दोषरोप पत्र दाखल करत प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

विशेष सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. सरकारी वकिल ऍड आर डी मोरे यांनी पीडितेतर्फे युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ. अनिल दानव यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे ऍड धात्रक व ऍड हैदरी यांनी कामकाज पाहिले. अखेर सर्व साक्ष व पुराव्यानंतर आरोपी प्रियकर प्रफुल्ल धुळे व संदीप कुरेकार विरोधात गुन्हा सिद्ध झाला. तर घटनास्थळावर संदीप सोबत हजर असलेल्या संदीपच्या दोन मित्रांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.

सदर प्रकरणात आरोपी प्रफुल्ल यास 376 (2) (N) नुसार 10 वर्ष सश्रम कारावास, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 5 महीने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम 376 (ड) नुसार 20 वर्ष सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 20 महीन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास यासह विविध कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला. तर आरोपी संदीप यास 376 (ड) मध्ये 20 वर्ष सश्रम कारावास व रुपये 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 20 महीन्यांचा अतिरिक्त सश्रम कारावास याशिवाय विविध कलमान्वये शिक्षा व दंड ठोठावला.

हे देखील वाचा:

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

भांडण पाहल्याने तरुणाला गोट्याने व काठीने जबर मारहाण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.