वणीत नुकत्याच जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा भीषण अपघात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या आठवड्यातच वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालेल्या महिला डॉक्टरचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. यात महिला डॉक्टर यांचा जागीत मृत्यू झाला. तर त्यांच्या पतीला डॉक्टर दाम्पत्याचा वरो-याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला तर पतीचे चंद्रपूरला उपचारासाठी नेताना निधन झाले. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान वरो-याजवळील बायपास रोडवर हा अपघात झाला. डॉ. अश्विनी झाडे – गौरकार व अतुल गौरकार असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याला एक वर्षांचे बाळ आहे. बाळाला वरो-याला आजी आजोबाकडे ठेवून हे दाम्पत्य वणीसाठी निघाले होते. त्यामुळे बाळ या अपघातातून बचावले.
सविस्तर वृत्त असे की डॉ. अश्विनी झाडे गौरकार या माजरी येथील रहिवासी होत्या. त्या काही दिवसांआधी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होत्या. गेल्या आठवड्यातच त्या वणीतील ग्रामीण रुग्णालयात जॉईन झाल्या होत्या. त्या नांदेपेरा रोडवर राहत होत्या. तर त्याचे पती डॉ. अतुल गौरकार हे वरोरा येथील रहिवासी होते व ते आर्वी येथे कर्तव्यावर होते. आज गुडीपाडव्या निमित्त डॉक्टर दाम्पत्य हे वरोरा येथे आले होते.
दुपारी 3 वाजताच्या सुमारास बाळाला घरी झोपवून दोघे ही पती पत्नी वणीसाठी कारने MH34AM 4240 निघाले होते. दरम्यान वणीकडून वरो-याच्या दिशेने एक ट्रक येत होता. बायपासजवळ कारची समोरून येणा-या ट्रकशी आमनेसामने धडक झाली. हा ट्रक इतका भरधाव होता की धडक बसल्यानंतर ट्रकने काही अंतरावर कारला फरफटत नेले.
या अपघातात चालक डॉ. अश्विनी गौरकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती डॉ. अतुल गौरकार हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. डॉ. अश्विनी यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. तर गंभीर जखमी डॉ. अतुल गौरकार यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र वाटेत त्यांचा देखील मृत्यू झाला.
या अपघातामुळे एक वर्षांचे बाळ पोरके झाले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.