अज्ञात वाहनाने झोपलेल्या मजुराला चिरडले

जितेंद्र कोठारी, वणी : धाब्यावर जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने चिरडले. ही घटना सोमवार 15 मे रोजी सकाळी वणी यवतमाळ मार्गावर साई ढाबा परिसरात उघडकीस आली. मृतक जवळ मिळालेल्या आधारकार्डवरुन त्याचा नाव अब्दुल सत्तार मो. नजीर (52) रा. नागपुर असल्याची माहिती आहे. मृतक हा केरला टायर वर्क्स येथे कामगार असल्याची प्राथमिक पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताचा वणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयाच्या मोर्चरी मध्ये ठेवला आहे. घटनेबाबत मृतक यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.

Podar School 2025

वणी यवतमाळ मार्गावर लालपुलीया परिसरात मागील काही दिवसांपासून सतत अपघात होत आहे. नुकतेच तीन दिवसांपूर्वी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक लागून दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. वणी उपविभागात मागील 4 महिन्यात रस्त्यावर तब्बल 50 अपघातात घडले असून 28 जणांना आपले जीव गमवावे लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.