आमदार बोदकुरवार यांचे हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

जितेंद्र कोठारी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर शहरातील विविध भागात सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व मान्यवरांचे हस्ते शनिवार 15 जुलै रोजी करण्यात आले.

Podar School 2025

नांदेपेरा मार्गावर तिरुपती मंगल कार्यालय ते सुधीर दामले यांचे घरापर्यंत 20 लाखाच्या निधीतून सिमेंट रोड व पेव्हर ब्लॉकचे काम मंजूर झाले आहे. रविनगर मध्ये साळवे ते गजानन विधाते ते मरसकोल्हे यांचे घरापर्यंत 15 लाखाच्या निधीतून सिमेंट रस्ता व भूमिगत नाली बांधकाम, राळे ते खंडाळकर पर्यंत 23.75 लाखाचा सिमेंट रस्ता,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच जैन ले आऊट मध्ये 53.15 लक्ष रुपयांच्या निधीतून माता मंदिर परिसरात विविध ठिकाणी सिमेंट रस्ता, लादीकरण व नाली बांधकाम कामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज केले.

भूमिपूजन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अध्यक्ष माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, नितीन चहाणकर, पुंडलिक ठावरी, वैभव मेहता, मनोज राजूरकर व परिसरातील महिला पुरुष उपस्थित होते.

Comments are closed.