भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

रस्त्यात आडवा आलेल्या वृद्धाला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ एक ऑटो पलटी झाला. यात ऑटोचालकासह 7 भाविक जखमी झालेत. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अरबाज खान, गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी चटपलीवार, मनीषा चटपल्लीवार दोघे सर्व रा. सोमनाळा अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर दोन व्यक्ती या किरकोळ जखमी झाल्यात.

सोमनाळा येथून काही महिलांसह भाविक संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास केळापूरला देवीच्या दर्शनासाठी ऑटोने जात होते. 6.30 वाजताच्या सुमारास मारेगाव शहराच्या आधी असलेल्या तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ भरधाव ऑटोच्या समोर अचानक एक वृद्ध इसम आला. या वृद्धाला वाचवताना ऑटोचालकाने ऑटोचा ब्रेक मारला. त्यामुळे ऑटोचालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व ऑटोने दोन पलटी खाल्या.

या अपघातात ऑटो मधील 9 व्यक्ती जखमी झाले. चिंतामण कोवे वय सुमारे 75 वर्ष रा. मारेगाव असे ऑटोला आडवे आलेल्या वृद्धाचे नाव आहे. अपघात होताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिक मदतीसाठी पोहोचले. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना दिली. त्यानंतर लगेच ऍम्बुलन्स आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमींना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रथम उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. तर अरबाज खान,गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी चटपलीवार, मनीषा चटपल्लीवार हे सर्व रा. सोमनाळा अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

हे देखील वाचा: 

पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे महिलेची आत्महत्या

केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Comments are closed.