सिंधी वाढोणा येथील अल्पभूधारक शेतक-याची आत्महत्या

शेतातील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन

विवेक तोटेवार, वणी: एका अल्पभूधारक शेतक-यांने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. आज शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती नामदेव अवताडे (48) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा येथील रहिवासी होते. गावालगतच त्यांची 4 एकर शेती आहे. मारोती हे शुक्रवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी शेतात गेले होते. मात्र रात्री ते घरी परतले नाही. आज सकाळी त्यांच्या मुलाने शेतात जाऊन बघितले असता शेतातील झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मुलाने याची माहिती गावक-यांना व मुकुटबन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मारोती यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे. मारोती यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात

Comments are closed.