आणखी एक आत्महत्या… रंगारीपु-यातील इसमाची नदीकाठी फाशी

एकाच दिवशी आत्महत्येची दुसरी घटना... सततच्या आत्महत्येने हादरले वणी

विवेक तोटेवार, वणी: रंगारीपुरा येथील रहिवासी असलेल्या एका 52 वर्षीय इसमाने नवीन वागदरा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किसन गोसाविराम पारोथी (52) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. तो साउंड आणि डेकोरेशनचे काम करीत असल्याची माहिती आहे. आज दुपारी तो नवीन वागदरा येथील निर्गुडा नदीच्या काठावर असलेल्या एका झुडुपात गेला व तिथे त्याने नॉयलनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. किसनने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झाले नाही. दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास पोहवा दिगंबर किनाके व पोशी प्रवीण जाधव करीत आहे. आज सकाळी वणीतील गुरुनगर येथे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटनेने वणी हादरली आहे.

Podar School 2025

हे देखील वाचा: 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.