पाप मोठे एका भाईचे, डिक्कीत मांस होते गाईचे

गाईचे तब्बल 15 किलों मांस पकडले, आरोपी अटकेत

विवेक तोटेवार,वणी: आपल्याकडे गाय, बैल, वासरू, कालवड या गाईच्या वंशाची हत्या व तस्करी करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यासाठी कठोर कायदेही आहेत. तरीही लपूनछपून गुन्हेगार गाईच्या मांसााची विक्री तस्करी करतात. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं हा प्रयत्न हाणून पाडला. रविवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास रंगनाथ नगरमध्ये एका मोपेड गाडीच्या डीक्कीतून तब्बल 14 किलो 500 ग्राम गाईचे मांस पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार रविवारी सकाळी काही संघटनांना गाईच्या मांसविक्रीची माहिती मिळाली. वणीच्या रंगनाथ नगर येथे काही इसम गोमांस विक्रीसाठी आणत असल्याचं कळलं. त्यांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. पोलिसांनी मोपेड गाडीची डिक्की तपासली. त्यामध्ये काळ्या रंगाच्या वेगवेगळ्या सात पॉलीथीन पिशव्यांमध्ये गाईच्या मांसाचे तुकडे आढळलेत. अंदाजे 2,900 रूपये किमतीचे तब्बल 14 किलो 500 ग्रॅम गाईचे मांस पोलिसांना सापडले.

गाईचे मांस व एक मोपेड वाहन असा एकुण 22,900 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. फिर्यादी विशाल दुधबळे यांच्या तक्रारीनुसार या कारवाईत मोमिनपुरा येथील आरोपी मुहम्मद अनीस अब्दुल रशीद कुरेशी (50) याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर कलम 5,5 (क), 9,9 (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. ते मास गाईचे आहे की नाही याचे परीक्षण करण्याकरिता नमुने काढलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पशु वैद्यकिय अधिकारी हे ताब्यात घेतलेल्या त्या मांसाची तपासणी करतील.  घटनेचा तपास पो.हे.कॉं. मारोती पाटील करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांच्या आदेशानुसार पोउपनि सुदाम आसोरे, पोहेकॉं. गजानन होडगीर, पोलीस कॉन्स्टेबल वसीम, गणेश,नंदकुमार, रामेश्वर यांनी केली.

Comments are closed.