भाजपचा डंका… दणदणीत विजय… विद्या खेमराज आत्राम वणीच्या नवीन नगराध्यक्ष

शिवसेना उबाठा, महाविकास आघाडीच्या डॉ. संचिता नगराळे यांचा 4792 मतांनी पराभव

बहुगुणी डेस्क, वणी: नगर पालिका निवडणुकीचा निकाल अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीची निवडणूक होणार असे अंदाज बांधले जात असताना भाजपने वन साईड ही निवडणूक जिंकली आहे. भाजपच्या विद्या खेमराज आत्राम यांनी डॉ. संचिता विजय नगराळे यांचा 4792 मतांनी पराभव केला आहे. पहिल्या राउंडपासून भाजपची आगेकुच अखेर पर्यंत सुरु राहिली. एकाही राउंडमध्ये डॉ. संचिता नगराळे यांना मतांची आघाडी कमी करता आली नाही. विशेष म्हणजे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने उपाध्यक्ष पद देखील भाजपकडेच राहणार हे निश्चित झाले आहे.  

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
पुष्पाताई पुंडलीक आत्राम – वंचित बहुजन आघाडी – 1245
आत्राम विद्या खेमराज –  भाजप – 15377
पुष्पा कवडू कुळसंगे –  आप – 387
पायल यशवंत तोडसाम – शिवसेना – 4351
संचिता विजय नगराळे – शिवसेना (उबाठा) – 10585
भारती संतोष पेंदोर –  अपक्ष – 272
शेख काजल इस्माईल अख्तर – राष्ट्रवादी काँग्रेस (शप) – 622 (नोटा 362)

नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपने  29 पैकी 18 जागेवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीने 9 जागांवर विजय मिळवला आहे. यात 6 जागांवर शिवसेना उबाठाने तर 3 जागेवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर 2 जागा अपक्षाकडे गेल्या आहेत. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रभाग क्रमांक 1 ते 3 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

अवघ्या 6 मताने विजय ! प्रभाग क्रमांक 4 ते 6 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

‘टापू’ने सर केला गड ! प्रभाग क्रमांक 7 ते 9 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

भाजपचे सर्व उमेदवार विजयी…. प्रभाग क्रमांक 10 ते 12 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल

 

Comments are closed.