डोंगरगावमध्ये लग्नात राडा, एका महिलेसह 7 जणांवर गुन्हे दाखल

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथे एका लग्नात चांगलाच राडा झाला. यामुळे एका महिलेसह 7 जणांवर मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डोंगरगाव येथे गुरूवारी २६ एप्रिलला एका लग्न समारंभात नाचण्यावरून दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोन्ही गटातील लोकांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाठीकाठीने एकमेकास मारहाण करून जखमी केले. यावरुन पहिल्या गटातील  विकास बाबूजी मालवे (२५) याच्या तक्रारीवरून सुरेश विठोबा पवार, रामा विठोबा पवार, संजय रामा पवार, व बालाजी सुरेश पवार यांच्या विरुद्ध कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात.

तर सुरेश विठोबा पवार यांच्या तक्रावरून गजानन शेलारी मालवे, विनोद गजानन मालवे, किसन शेलारी मालवे, व कुसुम किसन मालवे यांच्या विरुद्धही वरील कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गुलाब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मारोती टोंगे व उमेश कुमरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.