अष्टपैलू व्यक्तिमत्व शंकर माधव वनकर अनंतात विलीन

0

प्रतिनिधी, मारेगाव: तालुक्यातील बोटोनी  येथील शंकर माधव वनकर यांचे दिनांक ०१/०५/२०१८ रोज मंगळवार ला प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक,संस्कृतिक जीवनात ठसा उमटवणारे शंकर माधव वनकर यांच्या अनेक कलागुणांमुळे परिसरात नामवंत व्यक्तिमत्व होते. त्याच बरोबर सामाजिक कार्यातदेखील हिरहिरीने भाग घेणारे, उत्कृष्ट असे तबलावादक म्हणून नावाजलेले शंकर माधव वनकर हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते.  त्यांना मधुमेह विकाराने ग्रासले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरामध्ये कुठेही अपघात झाला असला वा संकटाच्या  वेळी सदैव तत्पर असणारे,  सामजिक बांधिलकी असलेले शंकर माधव वनकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्यामुळे वनकर परिवार व त्यांचे आप्तेष्ट यांच्यात दुख: निर्माण झाले आहे. शंकर माधव वनकर यांचा जन्म २६ जानेवारी १९५२ रोजी झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.