वणी बसस्थाकावरून महिलेचे दागीने लंपास

0

विवेक तोटेवार, वणी: वणी बस स्थानकवरून सोमवारी एक महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरट्याचा शोध वणी पोलीस घेत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमवारी प्रशांत फाकरू ताजने (30) रा. वणी आपल्या कुटुंबासह वणीवरून राजूर गाडीत भद्रावती जात होते. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नीने पर्समध्ये दागिन्यांची चाचपडून पाहणी केली असता त्यामध्ये दागिने आढळले नाही. ज्यामध्ये गळ्यातील सोन्याची पोत किंमत 45000, गळ्यातील चैन 5 ग्रॅम किंमत 5000 रुपये, अंगठी 5 ग्रॅम किंमत 5000 रुपये, कर्णफुले 3 ग्रॅम किंमत 5000 रुपये असा ऐवज होता.

दागिने चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात येताच ताजने यांनी वणी पोलिसात तक्रार दाखल केली. वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास पो. उ. नि. काकडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.