सुखदायी रेल्वे प्रवासासाठी आता ‘रेल सारथी’

ॲपव्‍दारे रेल्‍वे प्रवाशांना मिळणार अनेक सोयी सुविधा

0

नवी दिल्‍ली: जगात सर्वात जास्त रेल्वेने प्रवास करणारे भारतीय आहेत. त्यांचा प्रवास पूर्वतयारीपासून तर ध्येयापर्यंत अधिक सुखकर व सोयीचा व्हावा म्हणून भारतीय रेल्वे प्रशासनाने एक नवे ॲप लॉन्‍च केले आहे. यामुळे एकाच ॲपव्‍दारे रेल्‍वे प्रवाशांना अनेक सोयी सुविधा मिळणार आहेत. तिकीट बुकिंग, रेल्‍वेविषयी माहिती, स्‍वच्छता आणि जेवणाची ऑर्डर या ॲपव्‍दारे करता येणार आहेण् केवळ या एका अॅपद्वारे प्रवाशांना अनेक सोयीसुविधा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना वेळेच्या बचतीसह अनेक फायदे होतील, असे असल्याचे रेल्‍वे प्रशासनाने सांगितले. रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्‍ते  ‘रेल सारथी’ या ॲपचे लॉन्‍चिंग करण्यात आले.

Podar School 2025

रेल्वे प्रशासनाने या आधी अशाच एका अॅपची निर्मिती केली होती. त्यामध्ये प्रत्येक प्रत्‍येक सुविधांसाठी स्‍वतंत्र ॲप डाऊनलोड करावे लागत होते. या नव्या अॅपमुळे ती अडचण आता दूर झाली आहे. रेल सारथी या एकाच ॲपमुळे अनेक सोयीसुविधा मिळणार आहेत. प्रवाश्यांची कामे सोपी व अधिक गतीने होतील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण वाचा: अन् चक्क चालकाशिवाय धावली मालगाडी, टळला मोठा अनर्थ)

परदेशी नागरिकांसाठी आता रेल्‍वेच्या ॲडव्‍हान्‍स बुकिंगसाठी १२० दिवसांवरून वाढवून ३६५ करण्यात आले आहेण्  थर्ड एसी कोचमध्ये दिव्यांगांसाठी लोअर बर्थ आरक्षित राहणार असून दिव्यांगासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मधली बर्थ आरक्षित राहणार आहे. मात्र एका थर्ड एसी कोचमध्ये एकच लोअर बर्थ दिव्यांगांसाठी आरक्षित असणार आहे.

महिलांसाठी अनेक ‘खास’ सुविधा

महिलांच्या सुरक्षितता व गरजांचा विचार करून खास सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना सुरक्षा, तक्रार आणि सूचना नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना रेल्वेचा प्रवास अधिक विश्वासार्ह ठरणार आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.