सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक पारसमल चोरडिया यांचे निधन

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील सुप्रसिद्ध सराफा व्यापारी तथा भारतीय जनता  पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचे वडील पारसमल प्रेमराजजी चोरडिया यांचे बुधवारी रात्री 12.15 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले.  ते 81 वर्षांचे होते. त्यांचे अंतिमसंस्कार शुक्रवारी 06 जुलै रोजी मोक्षधाम वणी येथे होणार आहे .

Podar School 2025

पारसमल चोरडिया हे धार्मिक प्रवृत्तीचे होते.  जैन समाजाच्या अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे योगदान होते. स्थानकवासी जैन श्रावक संघ वणीचे माजी अध्यक्ष चंद्रकुमार चोरडिया, धनराज चोरडिया, संजय चोरडिया व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य व वर्धमान इंटरनॅशनल संस्थेचे प्रमुख विजयबाबू चोरडीया यांचे ते वडील होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.