वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह

तालक्यात सातत्याने आढळणारे मृतदेह उष्माघाताचे?

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळील पट्टाचारा नगर येथील एका इसमाचा परिसरातीलच एका नालीजवळ सकाली मृतदेह आढळून आला. सचिन गणपत भालेराव (वय अंदाजे 38) असे मृतकाचे नाव आहे. तो पेलोडर ऑपरेटर म्हणून काम करायचा. काही वर्षांपूर्वी त्याचा एका अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा परिणाम त्याच्या स्वभावावर झाला होता. मानसिक परिस्थिती ठिक नसल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली होता. तेव्हापासून त्याला दारूचे व्यसन जडल्याची माहिती आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेत काही नागरिकांना त्याला बघितले होते. सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने अतीमद्यप्राषनाने झालेल्या उष्माघातातून तर त्याचा मृत्यू झाला नसावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मृतकाच्या पश्चात एक मुलगा व आई असा आप्त परिवार आहे.

Podar School 2025

नवरगाव येथील इसमाचा ढाकोरी बोरीजवळ आढळला मृतदेह
वणी-कोरपना रोडवरील ढाकोरी जवळील दत्त मंदिराजवळ एका इसमाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला. शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती होताच गावातील पोलीस पाटील यांनी याची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता सदर इसम हा मनोज वसंता मिलमिले (38) रा, नवरगाव ता. वणी असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती होताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. प्रकरणाचा पुढील तपास जमादार गंगाधर घोडाम करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

Comments are closed.