दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटल येथे पार पडली अवघड शस्त्रक्रिया
मनक्यावर करण्यात आलेली परिसरातील पहिलीच शस्त्रक्रिया, रुग्णाला मिळाले नवीन जीवन
बहुगुणी डेस्क: दिग्रस येथील श्री. डॉ. रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर येथे एका रुग्णावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. मनक्यावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया परिसरातील पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून यामुळे रुग्णाला नवीन जीवन मिळाले आहे. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडणा-या टीमचे परिसरात व वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे. डॉ. जयस्वाल, डॉ. अमर गड्डा यांच्या देखरेखीत ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रशांत रोकडे, डॉ. मदन राठोड, अजय करवे, मयुरी भाकरे, विजेता भगत, राजू डहाके, सदन झाडे यांनी सहकार्य केले. आरोग्यधाम हॉस्पिटलचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. संदीप दुधे, तसेच डॉ.श्याम जाधव (नाईक), डॉ. कल्पना श्याम जाधव (नाईक), डॉ. श्रीकृष्ण पाटील, डॉ. आशिष शेजपाल यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.