बालिकादिनाला बालिकाच ठरल्यात अव्वल
अहेरअल्ली येथील जि.प. शाळेत क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा
सुशील ओझा,झरी : ३ जानेवारी रोज जि. प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या स्पर्धेत तिन्ही मुलींनीच बाजी मारली हे विशेष. बालिकादिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली.
स्पर्धेमध्ये वर्ग ५ वा, वर्ग ६ वा व वर्ग ७ वीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झालेत. स्पर्धेमध्ये तीन टप्पे तयार करण्यात आले. भाषा ( सर्व ) कविता ताला सूरात गायन -१० गुण, वर्गनिहाय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न -४० गुण, सामान्य ज्ञान प्रश्न. -५० गुण, अशी एकूण १्०० गुणांची ही स्पर्धा झाली.
अध्यापन झालेल्या विषयाचा भाग किती समजला यासाठी उपयुक्त होईल याचे विशेष लक्ष ठेवण्यात आले . प्रश्नसंच मुख्याध्यापक एस. आर. केमेकार यांनी काढले. त्यात सर्व विषयाचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धा १० .३० ला सुरु झाली. सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोयर यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाविषयी माहिती मुख्याध्यापक केमेकार यांनी विशद केली .
प्रथम फेरीत सर्व वर्गांच्या सर्व विद्यार्थांना कवितागायनाची संधी मिळाली. त्यात त्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या फेरीत सर्व विद्यार्थ्यांना विषयांवर आधारित अभ्यासक्रमातील ४० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. त्यातही भरभरून प्रतिसाद मिळाला .
तिसऱ्या फेरीत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. अतिशय चुरशीची ही फेरी होती. ज्या विद्यार्थांना उत्तरे पटकन येतात त्यांना झटपट फेरीत शिट्टी वाजवून उत्तरे देण्याची मुभा होती. त्यामुळे ही फेरी फार चुरशीची झाली .
चौथी व अंतिम फेरी मागील झालेल्या तिन्ही फेरींमध्ये सर्वात जास्त गुण घेणाऱ्या प्रत्येक वर्गातील दोन स्पर्धक या फेरीस पात्र होते. या फेरीत एकूण सहा विद्यार्थी -विद्यार्थीनी सहभागी होते. त्यात कु. तृप्ती मन्ने, कु. तनवी भोयर वर्ग ७ वा, कु. शिल्पा शिरपूरे व किश राऊत वर्ग ६ वा, कु .अनुश्री भोयर व अनुष्का मन्ने यांचा सहभाग होता.
फेरीच्या अंतिम टप्यात कु तृप्ती मन्ने व कु तनवी भोयर यांच्यात प्रथम क्रमांकासाठी “टाय ” झालेला होता. कु तनवी भोयर व कु तृप्ती मन्ने यांच्यात प्रथम क्रमांकासाठी टाय झाल्याने विशेष फेरी घेण्यात आली. त्यात दिलेल्या शब्दांची जुळवाजुळव करून म्हण तयार करा अशी सूचना होती.
प्रत्येकी तीन -तीन म्हणी दिलेल्या होत्या. त्यात कु तनवी भोयर हिने दोन म्हणी पूर्ण करीत प्रथम क्रमाकांची बाजी मारली. कु तनवी भोयर ९२ गुण, कु तृप्ती मन्ने ९० गुण, कु अनुष्का मन्ने ८६ गुण, प्रथम बक्षीस – ७०१ रू कु तनवी प्रफूल भोयर वर्ग ७ वा यांना महाराजा मोबाईल गॅलरी पाटण बोरी याच्यातर्फे व्दितीय बक्षिस -५०१ रु, कु तृप्ती संदीप मन्ने वर्ग ७ वा
सुभद्राबाई गणपत भोयर व दीपक भोयर यांच्या संयुक्त विद्यमाने तृतिय बक्षिस -३०१ कु अनुष्का सुरेश मन्ने वर्ग ५ वा श्रीकांत काळे मु. अ. भिमनाळा यांच्या तर्फे गट शिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी विजेत्या स्पर्धकासाठी प्रोत्साहनपर वाचनिय बहुआयामी पुस्तके विद्यार्थ्याना प्रदान केलीत . त्यात प्रामुख्याने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फूले, आहिल्याबाई होळकर, थोर संत गाडगेबाबा या पुस्तकांचा समावेश आहे. ही पुस्तके वाचून त्यातील विचार आत्मसात करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .
बक्षिस वितरण शाळा पालक समिती सदस्य अशोक केळवतकर व अमोल चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले . विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शंकर केमेकार यांनी केले तर गुणलेखक व वेळाधिकारी म्हणून इतर शिक्षकवृंद यांनी काम केले. या कार्यक्रमातून विद्यार्थीं- विद्यार्थीनींना फार प्रेरणा मिळाली असा भाव त्यांच्या मनावर दिसून येत होता .
स्पर्धेकरिता विशेष सहकार्य मुख्याध्यापक एस. आर. केमेकार, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे, सहा. शिक्षिका कु .पी डब्ल्यू कुतारेकर, कु. एस .आर. गड्डमवार, कु एस. आर. बोडणक तथा सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनी जि. प. शाळा यांनी केले.
हेदेखील वाचा
आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण
हेदेखील वाचा